नाट्यकलाकृती हा समाजाचा आरसा आहे. त्यात प्रेक्षकांना अंतर्मुख करण्याची सर्जनशीलता आहे...
नाटकाच्या माध्यमातूनच मी अधिक प्रभावीपणे प्रबोधनाची भूमिका साध्य करू शकतो, याची मला संपूर्ण खात्री झाली आणि मनोरंजनातून प्रबोधन करणाऱ्या ‘बी पॉझिटिव्ह’ या नाटकाचा जन्म झाला. असे नाट्याविष्कार जोवर जनमानसात पोहोचणार नाहीत, तोपर्यंत कलाकृतीचं यश अपूर्णच. कारण तुमच्याकडे कितीही कौशल्य असलं, तरी जर त्याचा योग्य प्रचार आणि प्रसार करता आला नाही, तर कालांतराने त्या कलाकृतीला आत्महत्या करावी लागते.......